Pune : गर्दीत चोरट्याने प्रवासी महिलेचे ३ लाखांचे दागिने पळविले

एमपीसी न्यूज – गर्दीचा फायदा उचलत एस.टी बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधील सुमारे तीन लाखांचे दागिने चोरट्याने पळविले. ही घटना रविवारी (दि.13) दुपारी अडीचच्या सुमारास स्वारगेट ते कवठे महाकाळ प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी पुसेगाव, सातारा येथे राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला या स्वारगेट ते कवठेमहाकाळ हा प्रवास करण्यासाठी एस.टी. बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील सोन्याचे कडे आणि पाटल्या असा सुमारे 3 लाखांचा ऐवज चोरला आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.