Osmanabad Crime News: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर आठ महिने वारंवार अत्याचार

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद जिल्ह्यात  महिला आणि तरुणीवर लैंगीक अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. एका विवाहित तरुणाने एका तरुणीला फसवून  लैंगीक अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तरुण गावातीलच तरुणीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी- 2020 ते 8  ऑक्टोबर 2020 या काळात निरनिराळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले.

न्यायालयात विवाहासाठी आवश्यक कागदपत्र आणण्याच्या बहाण्याने 2 ऑक्टोबरला तो तरुण गावाकडे निघून गेला. तो न परतल्याने त्या तरुणीने त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो विवाहीत असल्याचे तिला समजले.

यावेळी त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्या तरुणीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन आमच्या घराकडे फिरकल्यास तुला ठार मारू, अशी धमकी दिली. अशा अशयाची फिर्याद पिडीत तरुणीने दिली असून त्यानुसार भा.दं.सं. कलम- 376 (2)(एन), 323, 504, 506, 34 आणि ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंदवला गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.