Osmanabad Crime News : तुळजापूरच्या मराठा मोर्चात 65 ग्रॅम सोन्यावर डल्ला; 5 चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज – मराठा मोर्चासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा आंदोलनकांच्या 65 ग्रॅम सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी तुळजापूर येथे घडली होती. याप्रकरणी 5 आरोपींना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमालासह मोटरसायकल हस्तगत केली आहे.

याबाबत माहिती अशी, तुळजापूर शहरात मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. येथे जमलेल्या गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी आंदोलकांचे 65 ग्रॅम सोन्याचे दागिने व खिशातील रोख रक्कम लंपास केली होती.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि तुळजापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केलेल्या तपासात आरोपी आकाश भगवान काळे (वय 32 वर्षे), गजानन आकाश करंजकर (वय 28 वर्षे, दोघे रा. सुळ गल्ली, लातूर), दत्ता वसंत गिरी, रा. बाभळगाव, जि. लातूर ), मयुर संजय मस्के (रा.   लातूर ), सिध्दार्थ संजय जाधव (रा. शिरापुर, ता. शिरुर) यांना ताब्यात घेतले.

या आरोपींकडून एकूण 13 हजार 500 रुपये रोख रक्कम व चोरीच्या दोन मोबाईल फोनसह गुन्ह्यात वापरलेली हिरो एचएफ डीलक्स (एम.एच. 24 बीएच 4307) आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.