शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Osmanabad News : परंडा येथे 11 किलो चंदन जप्त; चंदन तस्कर फरार

एमपीसी न्यूज – परंडा तालुक्यातील बावची येथे चंदनाची तस्करी करणाऱ्याच्या घरावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत चंदनाचा मोठा साठा जप्त केला असून तस्कर फरार झाला आहे.

याबाबत माहिती अशी, चंदनाचा अवैध साठा असल्याच्या गोपनीय खबरेवरुन परंडा पोलीस ठाण्याच्‍या पथकाने ग्राम-बावची ता. परंडा येथील सुधीर सायकर यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलीसांची चाहूल लागताच सुधीर सायकर हा पसार झाला.

त्याच्या घरात चंदनाच्या झाडाचा 11 कि.ग्रॅ. गाभा विनापरवाना साठवलेला आढळला. तो साठा जप्त करुन भारतीय दंड संहिता कलम 379, महाराष्ट्र वृक्ष तोड कायदा कलम 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

spot_img
Latest news
Related news