Osmanabad News: भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची पीडितेस भेट, एक लाखांची मदत

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील वीटभट्टी कामगार बलात्कार पीडित महिलेची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी भेट घेतली. तसेच भाजपाच्या वतीने या पीडित महिलेस एक लाख रुपये मदतीचा धनादेश दिला.

यावेळी भाजपा उमरगा तालुका अध्यक्ष  कैलास शिंदे यांनी रोख पाच हजार रुपये मदत दिली. या कार्यक्रमास राज्यातील, जिल्ह्यातील, तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.