Osmanabad News : मराठा आरक्षणासाठी हिंदू-मुस्लीम तरुणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेल्या स्थगितीला राज्य सरकारने आव्हान देऊन समाजाला आरक्षण द्यावे तसेच कोणतीही कोरोनाच्या काळात मदतीचा हात म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील मराठा क्रांती युवा संघाच्या वतीने राक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात शेकडो तरुणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात हिंदू -मुस्लिम तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या शिबिरादरम्यान महाराष्ट्र पैलवान संघटना उस्मानाबादचे तालुकाध्यक्ष पै.सतिश वाकुरे यांच्या वतीने स्टीमर मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांच्या वतीने राक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

रक्तदान शिबीरानंतर अल्पोपहाराचे आयोजन बंटी वाकुरे व सुरेश बनसोडे यांनी केले होते. यावेळी उस्मानाबाद पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, ढोकी गावचे उपसरपंच अमोल समुद्रे, प्रा. सुशील शेळके,  जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दगडू धावारे, गुणवंत देशमुख, जय निंबाळकर, पोलीस पाटील राहूल वाकुरे, महाराष्ट्र कुणबी संघटना अध्यक्ष तुकाराम शिंदे, बणी थोडसरे, नवनाथ शिंदे, अशोक काळे, अनंत शिंदे, भाऊसाहेब गरड, अमर देशमुख, दीपक देशमुख, सिराजमुल्ला पटेल, संजय जाधव काशिनाथ काळे, सुभाष गाढवे, अस्लमभाई पठाण, जकी काझी, दत्ता वाकुरे, गोविंद कुंभार, रामेश्वर पवार, महादेव शिंदे व मराठा क्रांती संघाचे युवा आयोजक उपस्थित होते.

सूत्रसंचालन अंकुश जाधव यानी केले. मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल हा आशावाद या कार्यक्रमाद्वारे व्यक्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.