Osmanabad News : आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही- छत्रपती संभाजीराजे  

मराठा आरक्षण मोर्चाच्या तिसऱ्या पर्वास तुळजापूर येथे जागरण गोंधळाने सुरुवात

एमपीसी न्यूज (प्रमोद राऊत) –  मराठा समाजाची आजची परिस्थिती आर्थिक सक्षम नसल्यामुळे आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर उतरून सरकारकडे न्याय मागतो आहे . परंतु, मागच्या सरकारने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही किंवा आरक्षणावर स्थगिती हटत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असून, मराठा बांधव आता शांत राहणार नसल्याचे खासदार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

तुळजाई नगरीतील मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या परवाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावण नगरीत सरकारच्या विरोधात महाजागर सकल मराठा समाजाचा वतीने मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसऱ्या पर्वास आज, शुक्रवारी (दि.९) आरंभ झाला.

शिवाजी महाराज चौक येथे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

या प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, मल्हार राणाजगजितसिंह पाटील, सचिन रोचकरी , विशाल रोचकरी, अभिजित कदम यांच्यासह सकल मराठा समाजाचे हजारोच्या संख्येने बांधव उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत ५८ शांत मोर्चे निघाले होते. राज्य सरकारकडे मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा निवेदने,आंदोलने,मोर्चे काढून सातत्याने याविषयी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला.

तुळजाई नगरी तुळजाभवानी माता ही कायमच मराठ्यांची ऊर्जादायी असल्याने सर्वच विधी असो वा कार्यक्रम आई भवानीच्या आशीर्वादाने करत असतो. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी तात्काळ मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे; अन्यथा मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.