Osmanabad News: जिल्ह्यातील महिलांना तात्काळ सुरक्षा द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपचा इशारा

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उस्मानाबाद जिल्हा महिला भाजपच्या वतीने आज (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

महाविकास आघाडीच्या काळात अवघ्या महाराष्ट्रसह उस्मानाबाद जिल्हयातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर असून सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत किती असंवेदनशिल व निष्क्रिय आहे. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचाराच्या घटना गांभीर्याने घेत नाहीत, असा आरोप करीत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत निष्क्रिय, झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी व महाराष्टातील व जिल्हयातील महिलांच्या सुरक्षेसंबधी शासनाने तात्काळ दखल घेवून कार्यवाही करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व युवा मोर्चा, युवती आघाडी, धाराशिव  यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा माधुरी गरड, भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्या मीना सोमाजी, जिल्हा सरचिटणीस आशा लांडगे, युवती जिल्हाध्यक्षा पूजा देडे, युवती जिल्हा सरचिटणीस पूजा राठोड, चिटणीस स्वाती शिंदे, मंजुषा कोकीळ, अंजली बेताळे, शोभा ठाकूर, सुशमा भोसले, सुशीला पवार,  मीना हजारे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, सुजित साळुंखे, कुलदीप भोसले, सचिन लोंढे, श्रीराम मुंबरे, सचिन काळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.