Osmanabad News: जिल्ह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस, उस्मानाबाद शहरात रस्त्यावर पाणीच पाणी

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून ढगांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस सुरू असून ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर सोयाबीन काढणी काहीशी थांबली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, जळकोट, वागदरीसह परिसरात हस्त नक्षत्रातील शेवटच्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाटा सह पावसाने जोरदार हजेरी लावली असून काळ्याकुट्ट ढगामुळे दुपारी अंधारचे वातावरण निर्माण झाले होते.

पावसाळ्यातील परतीचा पाऊस आणि महत्त्वाचे नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र होय . या नक्षत्रातील गेली 10-11 दिवस कोरडीच गेली. त्याचा फायदा सोयाबीन काढणीला झाला. सोयाबीन पिक काढणी अंतिम टप्प्यात आली असताना आणि बळीराजा रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरासह अन्य पिक पेरणीच्या तयारीत असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.

जमिनीची ओल जास्त झाल्याने फार शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. रविवारी पहाटेपासून विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिक पेरणीला दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबाद शहरात सर्वत्र पाणीच पाणी

गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे उस्मानाबाद शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शहरातून वाहणारी भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे. तर शहारात रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.