Osmanabad News: हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील 19 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर अत्याचार केल्याने तिचा मृत्यू झाला. तसेच सुरक्षा रक्षकांकडून तिचा मृतदेह घरच्या कुणालाही कल्पना न देता जाळण्यात आला. अतिशय घृणास्पद , क्लेशदायक असे कृत्य वारंवार आपल्या देशात होत आहे. असा गुन्हा करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा प्रभारी प्रशांत बाबर, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत कवडे, युवक प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्जा, युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनू खंदारे, सुहास बारकुल आदी उपस्थित होते. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.