Osmanabad News : श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

एमपीसी न्यूज – तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली.

शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ आहे. तत्पूर्वी पहाटे 06 ते सकाळी 09 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. शारदीय नवरात्रोत्सवात श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.

श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 20 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यात, दि.20 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 21 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.22 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.24 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, शनिवारी रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.