Osmanabad Crime : ‘फोन पे’ ऑफिस मधून बोलतोय सांगत 97 हजारांची ऑनलाईन फसवणूक

0

एमपीसी न्यूज – ‘फोन पे’च्या हेड ऑफिस मधून बोलत आहे, तुमचा सात हजाराचा रिवॉर्ड कंपनीकडून पाठवला आहे, तो स्विकारण्यासाठी नोटीफिकेशन तपासून पैसे पे करा, असे अनोळखी मोबाइल वरून फोन करत कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील एकाची 97 हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत माहिती अशी, कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील अविनाश नवनाथ वाघमारे यांना दि.11 रोजी 09.15 वा. सु. एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला की, “फोन पे हेड ऑफिसमधुन बोलत आहे, तुमचा 7,000/-रु. चा रिवॉर्ड कंपनीकडून पाठवला आहे, तो स्विकारण्यासाठी नोटीफिकेशन तपासून पे करा.” असे सांगून अविनाश वाघमारे यांना त्या फोनवरील व्यक्तीने बोलते ठेवले.

यावर अविनाश वाघमारे यांना आलेले ओटीपीचे संदेश त्यांनी वाचून खात्री न करता फोनवर बोलणाऱ्या समोरील व्यक्तीस पुन्हापुन्हा सांगितल्याने त्या अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तीने अविनाश वाघमारे यांच्या बँक खात्यातील एकुण 96 हजार 997 रु. टप्प्याटप्प्याने काढून घेऊन अविनाश वाघमारे यांची फसवणूक केली.

याप्रकरणी अविनाश वाघमारे यांनी दि.17 रोजी दिलेल्या माहितीवरून भा.दं.सं. कलम- 419, 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.