Osmanabad News : नवरात्रउत्सवात कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना महिला मंडळांतर्फे मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज – शारदीय नवरात्र महोत्सवात संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाकार्याध्यक्ष यांच्या वतीने 300 मास्कचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, उस्मानाबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड उपस्थित होते.

तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने नवरात्र उत्सवानिमीत्त भाविकांना तुळजापूर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तुळजापूर येथे ठिकठिकाणी जिल्ह्यातील पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दल यांसह गृहरक्षक दलाचे जवान तैनात आहेत.

बंदोबस्तातील पोलीस अधिकारी – कर्मचारी यांना कोविड- 19 चा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणे फार महत्त्वाचे आहे. ही बाब राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा शिवाजी पाटील व त्यांच्या सहकारी संगीता क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या महिला मंडळाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी एक सामाजिक दायित्व म्हणून त्या बंदोबस्तावरील पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले.

मनिषा पाटील यांच्याकडून तुळजापूर येथील पोलीस संकुल येथे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्याकडे 300 मास्क वाटप केले.

याप्रसंगी तसेच मनिषा पाटील यांच्या सहकारी या उपस्थित होत्या. मनिषा पाटील यांनी बंदोबस्तावरील पोलीसांना मास्क वाटप केल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी त्यांचे व महिला मंडळाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.