Osmanabad Rain : उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी

एमपीसी न्यूज – मंगळवारी रात्री पासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दुपारपर्यंत सुरु होता. 18 तासापासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता यात जिल्ह्याला चांगलेच पावसाने झोडपले आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावचा संपर्क तुटला आहे. प्रमुख प्रकल्पही टाचोटाच भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज हि सकाळपासून पाऊस सुरूच असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात, घरामध्ये घुसले आहे तर काही साठवण तलावाचा भराव खचल्याने हे साठवण तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मोठ्या प्रकल्पासह माध्यम आणि लघु प्रकल्पही भरले आहेत. त्यामुळे सीना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यालाच पावसाने झोडपले आहे . सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असून , प्रमुख प्रकल्पही टाचोटाच भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज ही सकाळपासून पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात, घरामध्ये घुसले आहे तर काही साठवण तलावाचा भराव खचल्याने हे साठवण तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील तेरणा प्रकल्प पूर्णपणे भरला असून त्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडले जात आहे . त्यामुळे काही ठिकाणी तेरणा नदीचे पाणी शेतातही घुसले आहे.

या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसाने जिल्ह्यातील काळेवाडी (परंडा) आणि मेडसिंगा (ता.उस्मानाबाद) येथील पाझर तलाव धोकादायक झाले आहेत. काळेवाडी येथील पाझर तलावाचा भरव खचला असल्याने सांडवा फोडण्याचे काम सुरू आहे.

मेडसिंगा येथील पाझर तलाव क्रमांक दोनही धोकादायक बनला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून तेथील सांडवा फोडण्याचे काम सुरू होते. दरम्यान पाऊस सुरूच असल्याने तेथेही धोका वाढला आहे . दरम्यान निम्न तेरणा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे . त्यामुळे सध्या धरण 80 टक्के भरले आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्रीपर्यंत निम्न तेरणा ( माकणी ) प्रकल्पातून पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत . दरम्यान मांजरा प्रकल्पही 85 टक्केपर्यंत भरला असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे .

बोरी नदीवरील नळदुर्ग किल्ल्यातील नर – मादी धबधबा सध्या ओसंडून वाहू लागला आहे . धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून या धबधब्यातून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडत आहे.

बार्शी-उस्मानाबाद रस्ता बंद
नारी (ता. बार्शी ) येथील तसेच शेलगाव येथील पुलावर पाणी आल्याने लहान व मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. याशिवाय एसटी महामंडळानेही बसफेऱ्या बंद केल्या आहेत. याबरोबरच अनेक गावाला जाणाऱ्या रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे या गावांचाही संपर्क तुटला असून पुलावरून पाणी वाहत असताना वाहधारकांनी पूल ओलांडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.