Pune : इतर ठिकाणी सत्कार होतात, आज कौतुक झाले – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – इतर ठिकाणी सत्कार होतात, आज कौतुक झाले, अशा शब्दांत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथून पुढे माझ्या हातून चुकीचे काम होणार नाही, अशा प्रकारे सर्व पक्षीय सत्कार करून वेगळा पायंडा पाडला आहे. कोथरूडमध्ये ज्ञानवंत माणसे राहतात. अशा प्रकारचा कार्यक्रम करून वेगळी राजकीय संस्कृती पाहायला मिळाली. महापौर पद हे प्रत्येक कोथरूडकरांचा अभिमान आहे. माझ्या पक्षाने मला खूप संधी दिली. त्याबरोबर मला निवडून देऊन काम करण्याची सेवेची कोथरूडकरांनी संधी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ नागरी सत्कार समिती कोथरूडतर्फे सुपूत्र महापौर मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ यांचा सोमवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मनसेचे माजी नगरसेवक ऍड. किशोर शिंदे, नेते बाबू वागस्कर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले, सर्वांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता म्हणून मुरलीधर मोहोळ यांची ओळख आहे. निरागस, निष्पाप व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना माझ्या पक्षातर्फे पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री खूप चांगले काम केले.

बाबू वागस्कर म्हणाले, महापालिकेच्या सभागृहाला विशेष महत्व आहे. खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण हे नेतृत्व पुढे आले. मुरलीधर मोहोळ हा हिराच आहे. स्थायी समिती अध्यक्ष पाठोपाठ महापौर पदही दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.