OTT Platform – स्थलांतरितांच्या प्रश्नावर आधारित ‘कच्चे दिन’ आज प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Platform - 'Kachche Din' a Movie based on the problems of immigrants to be released today

एमपीसीन्यूज : सध्या चौथ्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद असली तरी OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सध्याच्या काळातील मजुरांचे प्रश्न आणि त्यांचे स्थलांतर यावर आधारित ‘कच्चे दिन’ हा चित्रपट आज, शुक्रवारी (२२ मे) युट्युबवर प्रदर्शित झाला आहे.

यात एका स्थलांतरित टॅक्सी ड्रायव्हरची   कथा असून त्यात मुंबईच्या अनेक छटा टिपल्या गेल्या आहेत.

मागील दोन महिन्यापासून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशच ठप्प आहे. रोजी – रोटीची फिकीर असल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यावरच या ‘कच्चे दिन’ या चित्रपटाची कथा आधारित आहे.

काही दिवसांपूर्वीच याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली होती. अखेर आज हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांच्या या चित्रपटात दीपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत झळकले असून त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात यशपाल शर्मा, अश्रूत जैन, टीना सिंग हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=1pldTMHH-Zs

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.