Kolhapur News : खोलात जाऊन चौकशी करण्याचा आमचा निर्णय योग्य : शरद पवार

एमपीसी न्यूज : बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.’धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडितेने आपली तक्रार मागे घेतली अशी बातमी वाचण्यात आली आहे. पण आम्ही या प्रकरणावर चर्चा केल्यावर आम्हाला वाटलं होतं, की सत्यता पडताळली पाहिजेत.

सत्यता पडताळून पाहिल्या शिवाय आपण कारवाई करू नये, अशी भूमिका आम्ही घेतली होती. हे प्रकरण गंभीर होते. परंतु, ज्यावेळी कागदपत्रातून आमच्यासमोर माहिती आली, त्यामुळे खोलात जाऊन चौकशी करण्याचा निष्कर्ष आम्ही काढला आणि आमचा हा निर्णय योग्य राहिला, असं शरद पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.