Pune : आमचे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल – अशोक चव्हाण

मपीसी न्यूज – काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे आमचे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आमच्या 3 पक्षात उत्तम समन्वय आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा होते. विरोधकांना सत्ता नसल्याचे जाणवते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस एक तर, चंद्रकांत पाटील दुसरेच बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, ऍड. अभय छाजेड उपस्थित होते.

खेड – शिवापूरचा टोलनाका हा केंद्र शासनाचा आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन काही निर्णय घेतले. हा टोलनाका पुढे घेण्याची मागणी आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही. धोरणात्मक निर्णय घेत असताना आपल्याला राजकारण करायचे नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील रस्त्यांसंदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. बंद पडलेल्या रस्त्यांची कामे सुरु करावित, त्यासाठी निश्चित कालावधी असावा, पुण्यासह राज्यात इतर कामे रेंगाळले आहेत. मराठवाडा, विदर्भातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. तसेच, मराठा आरक्षण संदर्भात न्यायालयात आम्ही व्यवस्थित बाजू मांडणार आहे. मराठा समाजाला राजकीय आरक्षण आवश्यक नसल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले.

तर, कोरेगाव – भीमाचा तपास एनआयएकडे देणे, याला राजकीय वास असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

आगामी महापालिका निवडणुकीतही ज्या ज्या ठिकाणावरून आघाडीसाठी जुळले जाणार, तिथे जुळवून घेऊ. कर्जमाफी हा काही शेवटचा उपाय नाही. शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा, यासाठी हे करण्यात आले आहे. आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.