India Corona Update : 1.10 कोटी पैकी 1.07 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

देशात 1.46 लाख सक्रिय रुग्ण

0

एमपीसी न्यूज – देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजार 742 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील एकूण 1.10 कोटी कोरोना रुग्णांपैकी 1.07 कोटी रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 1.46 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. देशात सध्या 1.39 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 30 हजार 176 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 07 लाख 26 हजार 702 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांत देशभरात 14 हजार 037 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 21 कोटी 30 लाख 36 हजार 275 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 05 हजार 844 नमून्यांची तपासणी मंगळवारी (दि.23) करण्यात आली आहे.

सध्याच्या घडीला देशात 1 लाख 46 हजार 907 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 104 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 56 हजार 567 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.24 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीला सुरुवात करण्यात आली. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात आतापर्यंत 1 कोटी 21 लाख 65 हजार 598 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.