Maval Corona Update: मावळ तालुक्यातील सक्रिय 16 रुग्णांपैकी पाच जण कोरोना मुक्त

Out of 16 active patients in Maval taluka, five patients are corona free

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील सक्रिय 16 रुग्णांपैकी पाच रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 23 दिवसांमध्ये मावळातील शहरी भागात 6 व ग्रामीण भागात 10 अशा एकूण 16 जणांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे.

मावळातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. तळेगावात दि. 7 मे रोजी तालुक्यातील पहिला कोरोना रूग्ण सापडला होता. त्यापाठोपाठ दि. 11 मे रोजी माळवाडी येथे दुसरा रुग्ण आढळला. ते दोन्ही रूग्ण कोरोना मुक्त झाले होते.

त्यानंतर दि. 19 मे अहिरवडे, दि. 21 मे चांदखेड दि. 24 मे घोणशेत येथील प्रत्येकी मिळून तीन पॉझिटिव्ह झालेल्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण पाच रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे व गटविकासाधिकारी शरदचंद्र माळी उपस्थित होते.

दि. 28 मे रोजी कामशेत येथील नऊ महिन्यांच्या रूग्णाच्या संपर्कातील 14 जणांचे कोरोना चाचणी अहवाल व दि 29 रोजी परंदवडी येथील 40 वर्षीय शिक्षिकेच्या संपर्कातील आठ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

तळेगावात दि. 7 मे रोजी तालुक्यातील पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यापाठोपाठ 11 मे रोजी माळवाडी येथे दुसरा रूग्ण आढळला. त्यानंतर 19 मे अहिरवडे, 20 मे नागाथली, 21 मे वेहेरगाव व चांदखेड या दोन ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

दि. 22 मे रोजी तळेगावमध्ये एकजण तर 23 मे रोजी पुन्हा चांदखेड येथे 4 रुग्ण आढळले. दि. 24 मे घोणशेत आणि 25 मे व 26 मे या दोन दिवशी ब्रेक मिळाला होता.

दि. 27 मे रोजी खंडाळा येथील 74 वर्षीय व्यक्ती, 28 मे रोजी कामशेत येथील नऊ महिन्यांचे बाळ, दि. 29 मे रोजी परंदवडी येथील शिक्षिका व खंडाळा येथील 32 वर्षीय महिला.

म्हणजे दि. 27 मे पासून परत सलग 3 दिवस दि. 29 मे पर्यंत एक-एकने नवीन रूग्णांची वाढ झाली असली तरी अहिरवडे, चांदखेड, घोणशेत येथील या तिनही रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शनिवार दि 30 मे पासून आतापर्यंत एकाही रूग्णांची वाढ झालेली दिसून येत नाही. उलटपक्षी रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घटच होत आहे, ही मावळवासियांच्या व प्रशासनाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.