Pimpri corona News: शहरातील 39859 पैकी 26220 रुग्ण बरे, कोरोनामुक्तांचे प्रमाण 65.78 टक्के

शहरातील रुग्णसंख्या 40 हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाख आहे. त्यापैकी 39 हजार 859 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 1.59 टक्के आहे. बाधितांपैकी तब्बल 26 हजार 220 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.78 टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. जुलै महिन्यात रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली. ऑगस्टमध्ये देखील रुग्णवाढ सुरुच आहे.

शहरातील रुग्णसंख्या 40 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढत असली. तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

शहराची लोकसंख्या 25 लाखाच्या आसपास आहे. 10 मार्चपासून आजपर्यंत शहरातील 39859 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण केवळ 1.59 टक्के आहे. 39859 पैकी 26220 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. त्याचे प्रमाण 65.78 टक्के आहे.

पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये 6954 तर खासगी रुग्णालये, होम आयसोलेट असे सध्या 12 हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत शहरातील 751 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण 1.88 टक्के आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे.

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यात दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

कोरोना पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नाहीत. अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. शहरातील जवळपास 10 हजार रुग्ण घरीच उपचार घेऊन ठणठणीत झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.