Pune News : चोरी झालेल्या 910 मोबाईलपैकी पोलिसांनी 35 मोबाईल शोधले

एमपीसी न्यूज : हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदविण्यासाठी पुणे पोलिसांनी लॉस्ट अँड फाऊंड वेबसाईट तयार केली आहे. पोलीस स्टेशनला न जाता मोबाईल हरवल्याची तक्रार या साईटवर नागरिकांना करता येते. अशाच गहाळ झालेल्या 910 मोबाईलपैकी 35 मोबाईलचा पोलिसांनी शोध घेतला आहे. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलिसांच्या लॉस्ट अँड फाऊंड वेबसाईटवर नोंद झालेले मोबाईल शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या एका टीमने 35 मोबाईलचा शोध लावला आहे.

जून 2020 या महिन्यात लॉस्ट अँड फाऊंड या वेबसाइटवर 910 मोबाईल गहाळ झाल्याची नोंद होती. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पोलीस निरिक्षकांना बच्चन सिंग यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानुसार हरवलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी 35 मोबाईलचा शोध घेतला आहे. हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याची कारवाई सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.