Pune : महापालिका आरोग्य विभागाला आलेल्या 216 माहिती अधिकार अर्जापैकी 198 अर्ज निकाली

एमपीसी  न्यूज – महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध विषयांची माहिती मिळण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून माहिती अधिकार अर्जांचा पाऊस पडत आहे. या विभागात जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत 216 माहीती अधिकाराचे अर्ज आले असून त्यातील 198 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. 

 

महापालिकेच्या कारभारासंबंधी आणि इतर कारणांसाठी विविध विभागात माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकांकडून आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जातात. यामध्ये सर्वाधिक अर्ज बांधकाम विभागात दाखल होतात. याशिवाय आरोग्य सेवा, रूग्णालये, पालिकेच्या आरोग्य योजना, कर्मचारी नियुक्ती तसेच पालिकेच्या आरोग्य सेवा संबधित मोठ्या प्रमाणात माहिती अधिकारात अर्ज येतात. त्यानुसार, हे अर्ज पालिकेच्या संबंधित विभागांना पाठविले जातात.

 

यासंदर्भात पालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख आणि जनमाहिती अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, मागील सात महिन्यात सुमारे 216 अर्ज आले असून त्यातील 198 अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत. तर 18 अर्ज प्रलंबित आहेत. याशिवाय, प्रथम अपिल अर्ज 30 प्राप्त झाले असून त्यातील केवळ 2 अर्ज प्रलंबित आहेत. दरम्यान, माहिती अर्जांची माहिती अर्जकर्त्यांना देताना, अनेकदा संबंधित कर्मचार्‍यांकडून देण्यात येते, अशा वेळी त्याची गंभीर दखल संबंधित अधिकार्‍यांकडून फेरमाहिती सादर करणे तसेच खुलासे मागवून याचिकाकर्त्यांना माहिती देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.