LPG Cylinder Price : महागाईचा भडका ! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, व्यावसायिक सिलिंडरही महागलं!

एमपीसी न्यूज : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Pune News : पुण्यात पहिल्यांदाच होणार संत महंतांचे भव्य संमेलन व दर्शन

होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, 1 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याशिवाय 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल  (LPG Cylinder Price) 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.

आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत  1103 रुपयांवर पोहोचली आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.