Pune : पी. चिदंबरम यांचे शुक्रवारी व्याख्यान

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे सीएए-एनआरसी-एनपीआर आणि युनियन बजेट संदर्भात शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) व्याख्यान आयोजित केले आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री विश्वजित कदम, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, सोनल पटेल, रजनी पाटील, कुमार सप्तर्षी, पी. ए. इनामदार, अजित अभ्यंकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सीएए – एनपीआर – एनआरसी विरोधात जॉईंट ऍक्शन कमिटी पुणेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतन तुपे, अॅड. अभय छाजेड, अंकुश काकडे, विलास करोटे, संदीप बर्वे, सुभाष वारे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.