Pune : पाटील इस्टेट झोपडपट्टी दुर्घटनेतील पीडीत कुटुंबियांना आर्थिक मदत,स्थायी समितीचा निर्णय 

एमपीसी न्यूज – पाटील इस्टेट झोपडपट्टी येथे मागील महिन्यात लागलेल्या आगीत पूर्ण घर जळालेल्या कुटुंबांना प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि अंशतः घर जळालेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

यावेळी योगेश मुळीक म्हणाले की, तहसिलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 306 घरे बाधीत झालेली आहेत. त्यापैकी 177 घरे पूर्णतः बाधीत झाली असून, त्या कुटुंबांना प्रत्येकी अकरा हजार रुपये याप्रमाणे 19 लाख 47 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे. अंशतः बाधीत घरांची संख्या 129 इतकी आहे. त्या कुटुंबाना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 6 लाख 45 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे. अशी एकूण 306 कुटुंबांना 25 लाख 92 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार असून अर्थसंकल्पाच्या झोपडपट्ठीधारकांना आपत्कालिन सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील शिल्लक आर्थिक तरतुदीतून ही मदत करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.