Pimple Saudagar : पी.के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात 

एमपीसी  न्यूज –  पिंपळे सौदागर येथील व्ही. एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सांगितली. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तीशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम वाचनामुळे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज निदान एक-दोन पाने तरी अभ्यासाव्यतिरिक्त वाचन करावे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे संदेश दिले.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील  व सुप्रिया कोमपेल्ली यांनी केले तर आभार रूपा तारे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.