Pimple Saudagar : पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये  दहीहंडी उत्सव  उत्साहात

एमपीसी  न्यूज – व्ही एच बी पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये  दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाची वेशभूषा व रंगबेरंगी कपडे परिधान करून विविध हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य करत होती. तसेच विद्यार्थ्यांनी दहीहंडीच्या गाण्यांवर नृत्य करून मनमुराद आनंद लुटला व दहीहंडी फोडली तसेच यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.

या दही हंडीमध्ये शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगूळकर, पर्यवेक्षिका सविता आंबेकर, संगीता पराळे तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या या उत्साहाला पाहून पालक मंत्रमुग्ध झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like