Pimpri : भारत गौरव प.पू.108 पुलकसागरजी महाराज यांचा मंगल प्रवेश

एमपीसी न्यूज – भारत गौरव प. पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचा निगडी येथील जैन मंदिरात रविवारी दि, 9 सप्टेंबरला मंगल प्रवेश होत आहे.

निगडी येथील जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम यानिमित्त होणार आहे. सकाळी साडेसात वाजता प्राधिकरण येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक संभाजी चौक, भेळ चौक, शांतीसागर चौक मार्गे स्पाईन रोडने मिरवणूक भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे पोहचेल.

या मिरवणुकीचे खास आकर्षण रथ, ढोलपथक, राजस्थानी संगीत मंडळ, लोकप्रतिनिधी, कलश घेतलेल्या महिला मंडळ व अनेक जैन श्रावक यांचा समावेश असेल. मंदिरामध्ये महाराजांचे पादपक्षालण होईल. त्यानंतर भगवंताचा अभिषेक होईल. त्यानंतर महाराजांचे मंगलप्रवेश होईल. दि. 14 ते 24 सप्टेंबर या कालावधीत पुलकसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात  पर्युषण पर्वाचे आयोजन केले आहे, याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.