Padma Award: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण तर बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

एमपीसी न्यूज – सर्वाधिक बहुमान म्हणून गणल्या जाणाऱ्या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार तर पुण्याच्या पूनावाला समूहाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना सुद्धा मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांमुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये साधारण 128 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्कारांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे.

यामध्ये कला क्षेत्रातील सर्वाधिक गणल्या गेलेल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पूनावाला समुहाचे अध्यक्ष सायरस पूनावाला आणि टाटा सन्सचे नटराजन चंद्रशेखर यांना सुद्धा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जनरल बीपीन रावत, कल्याण सिंह, राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, तर आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णअक्षरांनी इतिहास लिहिणारे नीरज चोप्रा आणि वंदना कटारिया तसेच गायनाला एक वेगळ्याच उंचीवर पोहोचवणारे गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे – 

पद्मविभूषणचे मानकरी

  • प्रभा अत्रे
  • राधेश्याम खेमका (मरणोत्तर)
  • बिपीन रावत (मरणोत्तर)
  • कल्याण सिंग (मरणोत्तर)

पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

  • विजयकुमार डोंगरे
  • हिमंतराव बावसकर
  • सुलोचना चव्हाण
  • सोनू निगम
  • अनिल राजवंशी
  • बालाजी तांबे (मरणोत्तर)
  • भिमसेन सिंगल

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी

  • सायरस पूनावाला
  • नटराजन चंद्रशेखरन

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.