Chinchwad News : ॲड. बार असोसिएशनच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी (दि. 23) चिंचवड येथील चाफेकर वाड्यात हा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोरक्षनाथ झोळ, उपाध्यक्ष पांडुरंग शिनगारे, सचिव ॲड. महेश टेमगिरे, महिला सचिव ॲड. मोनिका गाढवे, सहसचिव ॲड. अनिल शिंदे, माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुहास पडवळ, ऑडिटर धनंजय कोकण, ॲड. ऋतुराज आल्हाट, ॲड. दिनेश भोईर, ॲड. अमित गायकवाड, ॲड. मंगेश नढे, ॲड. प्राची शितोळे, ॲड. कृष्णा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रभुणे यांनी वकिलांचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सहभागाचे महत्व विशद केले. वकिलांनी गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी मोलाची कामगिरी बजावली असं गिरीश प्रभुणे म्हणाले. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील लोकांना न्याय मिळावा यासाठी तसेच, या घटकातील निरापराध लोकांना तातडीने न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला गिरीश प्रभुणे यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमापूर्वी क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्या जन्मस्थळास भेट देण्यात आली. क्रांतीवीर चाफेकर समितीचे कार्यवाहक ॲड. सतिश गोरडे यांनी चाफेकरांचा संपूर्ण इतिहास उलगडून सांगितला. ॲड. उषा जाधव, ॲड. ज्योती गायकवाड, सविता तोडकर आणि ॲड. शिरिन शेख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सुहास पडवळ यांनी केले तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिल शिंदे यांनी केले. ॲड. ऋतुराज आल्हाट यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.