_MPC_DIR_MPU_III

Chinchwad News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरूकुल मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन पुरस्काराचा आनंद साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि.4) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवडमधील गुरुकुल मध्ये हा छोटेखानी सत्कार कार्यक्रम पार पडला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले, ब्राह्मणांनी संघटित होऊनच काम केले पाहिजे. त्यांनी यावेळी गप्पांमधून ब्राह्मणांचा इतिहास सांगितला. महापालिकेने त्यांच्या संस्थेला मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी नोटीस दिली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महासंघाचे अध्यक्ष शर्मिला महाजन यांनी निषेध नोंदवला.

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शहरअध्यक्ष शर्मिला महाजन, कार्याध्यक्ष दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, प्रदेश महिला चिटणीस ॲड. अंतरा देशपांडे, शहर अध्यक्ष सुहास पोकळे, सरचिटणीस सचीन कुलकर्णी, शामअंत कुलकर्णी, चिटणीस प्रशांत कुलकर्णी, महिला उपाध्यक्ष सुषमा वैद्य, दिलीप जोशी, शंकर कुलकर्णी, कुणाल सारस्वत, अनंत कुलकर्णी, डॉक्टर माधवी महाजन ज्योती कानिटकर आणि एपीसी न्यूजचे जाहिरात विभाग प्रमुख अनुप घुंगुर्डे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानिटकर यांनी केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.