Padmavati Mandir : यंदा मोठ्या उत्साहात ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात माऊलींची पालखी पद्मावती मातेकडे

एमपीसी न्यूज : नवरात्रात प्रथा परंपरेनुसार (Padmavati Mandir) माऊली मंदिरातून माऊलींची पालखी पद्मावती मंदिराच्या येथे जाते. कोरोना काळात शासनाच्या नियम अटीमुळे यात खंड पडला होता. यंदा मात्र कोरोनाचे कुठलेही निर्बंध नसल्याने या नवरात्रात शुक्रवार दि.30 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात माऊली मंदिरातून माऊलींची पालखी पद्मावती मंदिराकडे ज्ञानोबा माऊलीच्या नामघोषात दुपारी अनेक भविकांसह पोहचली.

देवस्थानच्या वतीने विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते देवीस अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या (Padmavati Mandir) सभामंडपात पालखी व देवीसमोर हरिभजन करण्यात आले. येथे अनेक भाविक भक्तांनी पद्मावती माता व माऊलींच्या पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच, यावेळी दुपारी पद्मावती मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Today’s Horoscope 01 October 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पद्मावती रस्त्यावर काही नागरिकांनी भाविक भक्तांसाठी मोफत सरबताची सोय केली होती. पद्मावती मंदिर येथून पालखी नंतर विश्रांतवडाकडे रवाना होऊन तिथे काही वेळ सायंकाळी विसावली व पद्मावती चौक येथील भोसले निवास येथे थांबून परत माऊली मंदिराकडे प्रस्थान केले. पालखी स्वागतासाठी पालखी मार्गावर विविध ठिकाणी भाविकांनी रांगोळ्या काढल्या होत्या. यावेळी अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.