Chinchwad : पंचमहाभूतांच्या रांगोळीने सजली पाडवा पहाट

एमपीसी न्यूज – सोर्स ऑफ द आर्ट इन्स्टिट्यूट या संस्थेच्या मुक्तांगण संस्कार भारती यांच्या वतीने चिंचवड गाव येथे दिवाळी पडावा निमित्त रांगोळी प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनात पंचमहाभूतांची रांगोळी काढण्यात आली. आपल्या संस्कृतीची जपणूक करत पुढील पिढीला याची माहिती व्हावी, या उद्देशातून हे प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे यंदा चौथे वर्ष होते.

सोर्स ऑफ द आर्ट इन्स्टिट्यूट ही संस्था कला व क्रीडाक्षेत्रातील विविध उपक्रमांना प्राधान्य देते. दिवाळी पाडवाच्या निमित्ताने गुरुवार (दि. 8) रोजी पहाटे रांगोळी प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनातील सहभागी कलाकारांनी पंचमहाभूतांची रांगोळी काढली. दहा हजार पेक्षा अधिक कलाप्रेमींनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्राख्यात रांगोळी कलाकार जगदिश चव्हाण, संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश जोशी उपस्थित होते. रांगोळी ही कला आज अत्याधुनिक स्तरावर आली आहे. कलाकारांनी याचा लाभ घेऊन देशाचे नाव उंचावर न्यावे, असा संदेश जगदीश चव्हाण यांनी दिला. शरद कुंजीर यांनी थेट केलीग्राफी चित्रण प्रस्तुत केले.

मुक्तांगण संस्थेची माहिती मधुरा कुलकर्णी यांनी दिली. संस्कार भारतीची ओळख हर्षद कुलकर्णी यांनी करून दिली. पाहूण्यांचे स्वागत अषिश काळे, रोहीदास रोकडे यांनी रोपटे देऊन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन काळभोर यांनी केले. संस्कार भारती माजी अध्यक्ष अमित गोरखे, प्रभागातील नगरसेवक सुरेंद्र भोईर, ब प्रभाग अध्यक्ष करूणा चिंचवडे, अपर्णा डोके, नाना काटे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.