Technology News : फेसबुकवरील पृष्ठांना आता नसणार लाईक बटण!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : व्हॉट्स ॲपची प्रायवसी पॉलिसी चर्चेत असतानाच फेसबुकनेही आता त्यांच्या प्रायवसी पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत. महत्वाचा बदल म्हणजे फेसबुकने सार्वजनिक (पब्लिक) पृष्ठांना असलेले लाईक बटन काढून टाकले आहे. फेसबुक अपडेट केल्यानंतर आता या पृष्ठांना फक्त फॉलो करता येणार आहे.

या पॉलिसीमध्ये पृष्ठांच्या रचनेमध्ये बदल केलेला आहे. प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, नेते, ब्रॅंड्स, खेळाडू अशा व्यक्तींची फेसबुक पृष्ठे यापुढे फक्त फॉलो करता येणार आहे. मात्र वापरकर्ता हा त्यांच्या पोस्ट्स मात्र पूर्वीसारख्याच लाईक करू शकणार आहे. पृष्ठांच्या न्यूजफीडमध्येही काही बदल करण्यात आलेले आहेत.

पृष्ठे आता ट्रेंड्स फॉलो करू शकतील, त्यांच्या फॅन्स बरोबर संवाद साधू शकतील. इतकेच नव्हे तर पृष्ठे आता ‘Q एंड A’ म्हणजेच प्रश्न-उत्तरांचा प्रकार देखील घेऊ शकतील. यांत फॉलोवर्स पृष्ठांना कोणतेही प्रश्न विचारू शकतील आणि पृष्ठे त्याची उत्तरे देऊ शकतील. फेसबुकवरील वैयक्तिक खाती व सार्वजनिक खाती शोधणं यांमुळे सोपं पडणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.