Pakistan : पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट; अन्नाचा पडू शकतो तुटवडा

एमपीसी न्यूज : श्रीलंकेपाठोपाठ (Pakistan) आता पाकिस्तानमध्ये महागाई वाढली असून तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे डगमळीत झाली आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकटाच्या काळात पिठाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. कराचीमध्ये, पीठ 140 ते 160 रुपये (INR 50-58) प्रति किलोपर्यंत पोहोचले. आता पिठासाठी लोक एकमेकांशी भांडू लागले आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे; ज्यामध्ये लोक एकमेकांना पीठासाठी नाल्यात फेकताना दिसत आहेत.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे शहरातील इमारतीचे 15 विद्युत मीटर जळून खाक

राजधानी इस्लामाबादमध्ये 10 किलोची पिठाची पिशवी 1500 रुपयांना विकली जात आहे. तर 20 किलो पीठ 2800 रुपयांना मिळते. पाकिस्तानातील जनता एकीकडे महागाईशी झुंजत आहे, तर दुसरीकडे अन्नासाठी भुकेली झाली आहे. शासनाकडून अनुदानित पीठ ट्रकमध्ये विकले जात आहे. पाकिस्तानी पंजाबमधील गिरणी मालकांनी पिठाच्या दरात वाढ केली आहे. ते 160 रुपये किलो दराने पीठ विकत (Pakistan) आहेत. बलुचिस्तानचे अन्न मंत्री झामरक अचकझाई यांनी सांगितले की, राज्यातील गव्हाचा साठा पूर्णपणे संपला आहे. ते म्हणाले, की बलुचिस्तानला तत्काळ प्रभावाने सहा लाख पोती गव्हाची गरज आहे. अन्यथा मोठे संकट उभे राहील. त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यांमध्येही गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. बलुचिस्तानने इतर राज्यांकडून मदत मागितली होती, पण त्यांनी साफ नकार दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.