Pakistan Cricket: इंग्लंड दौर्‍यासाठी पाकिस्तानच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ‘या’ माजी क्रिकेटपटूची नेमणूक

Pakistan Cricket: Former Pakistan Cricketer younis khan appointed as a batting Coach For England Tour क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे.

एमपीसी न्यूज- इंग्लंड दौर्‍यासाठी पाकिस्तानच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ‘युनूस खान’ या अनुभवी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूची निवड करण्यात आली आहे.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने आज (दि.9) याबाबत घोषणा केली आहे. 42 वर्षीय युनूस खान याने आपल्या करिअरमध्ये 118 सामन्यात 52 च्या सरासरीने 10,099 रन्स केल्या आहेत.

2009 मध्ये कराची येथे श्रीलंका संघाच्या विरूद्ध त्याने केलेल्या 313 धावसंख्येमुळे त्याचे ICC रँकिंग सुद्धा वाढले होते. इंग्लंडविरुद्ध सुद्धा युनूस खानने उत्कृष्ट कामगिरी करत 9 कसोटीमध्ये 810 रन्स कुटल्या असून यामध्ये 2 शतक आणि 3 अर्धशतकांचा देखील समावेश आहे.

युनुस खानबरोबर ज्येष्ठ पाकिस्तानी फलंदाज तसेच प्रसिद्ध स्पिनर मुश्ताक अहमद यांची फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी तसेच तीन T20 सामन्यासाठी करण्यात आली आहे.

क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. तसेच टीमची कामगिरी उंचावण्यासाठी मला योगदान देता येईल. मिसबा उल हक, मुश्ताक अहमद आणि वकार युनूस यांच्याबरोबर काम करायला आणि पाकिस्तान क्रिकेट टीमला एक चांगले प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे मत युनूस खान यांने व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.