Pakistan Cricket Team: पाकच्या आणखी 7 खेळाडूंना कोरोनाची लागण, एकूण 10 खेळाडू बाधित

Pakistan Cricket Team: 7 more Pakistani players infected with corona, 10 players affected इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 29 जणांच्या संघाची घोषणा केली होती. ज्यात काही राखीव खेळाडूंना जागा देण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी (दि.23) निष्पन्न झाले होते. त्यानंतर, पाकिस्तान संघाला आणखी एक धक्का बसला असून संघातील अजून सात खेळाडूना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघातील सर्व खेळाडूंची रावळपिंडी येथे दौऱ्यापूर्व कोरोना चाचणी करण्यात आली होती.

या चाचणीमध्ये सुरुवातीला शाहदाब खान, हैदर आली आणि हॅरिस रौफ या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, आणखी सात जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पाकिस्तान संघाला चांगलाच धक्का बसला आहे.

नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या खेळाडूंमध्ये फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या सात जणांचा समावेश असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 29 जणांच्या संघाची घोषणा केली होती. ज्यात काही राखीव खेळाडूंना जागा देण्यात आली होती. बिलाल आसिफ, इमरान बट, मुसा खान आणि मोहम्मद नवाझ हे सध्या पाक संघात राखीव खेळाडू म्हणून आहेत.

इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ 3 कसोटी आणि 3 T20 सामने खेळणार आहे. पाकिस्तानचे 10 खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like