Pakistan Cricket Team Announced: इंग्लंड दौर्‍यासाठी पाक संघाची घोषणा, 19 वर्षीय हैदर अलीला संधी

Pakistan Cricket Team Announced: Pakistan team announced for England tour, opportunity for 19-year-old Haider Ali पाकिस्तानच्या निवड समितीने माजी कर्णधार सर्फराज अहमद याला देखील संघात स्थान दिले आहे. सर्फराजने त्याचा शेवटचा सामना ऑक्टोबर 2019 मध्ये खेळला होता.

एमपीसी न्यूज- पाकिस्तान संघ ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी (दि.12) 3 कसोटी आणि 3 T20 सामन्यासाठी 29 सदस्यीय संघाची घोषणा केली. नव्या दमाचा ‘हैदर अली’ या खेळाडूने स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघात पहिल्यांदा स्थान मिळाले आहे.

हैदरने 2019-20 या वर्षात दमदार कामगिरी केली होती. 19- वर्षाखालील विश्वचषकात पाकिस्तानकडून खेळताना सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता.

हैदर अली शिवाय काशीफ भट्टी हा दुसरा नवा चेहरा आहे. काशिफची ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्याला सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

पाकिस्तानच्या निवड समितीने माजी कर्णधार सर्फराज अहमद याला देखील संघात स्थान दिले आहे. सर्फराजने त्याचा शेवटचा सामना ऑक्टोबर 2019 मध्ये खेळला होता.

वेगवान गोलंदाज सोहेल खान याने चार वर्षांनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने त्याचा शेवटचा सामना 2017 साली खेळला होता. मोहम्मद आमिर दुसऱ्यांदा वडील होणार असल्याने तो इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाही. तर हॅरिस सोहेल हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंग्लंड दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला.

असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठीचा पाकिस्तान संघ

अझर अली (कसोटी कर्णधार), बाबर आझम (कसोटी उपकर्णधार आणि T20 कर्णधार), आबिद अली, फखर जमान, इमाम उल हक, शान मसूद, असद शफिक, फवाद आलम, हैदर अली, इफ्तिहार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद रिझ्वान आणि सरफराज अहमद (यष्टीरक्षक), फाहिम अश्रफ, हॅरिस रऊफ, इम्रान खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, सोहेल खान, उस्मान शिंवरी, वहाब रियाज, इमाद वसीम, कशिफ भट्टी, शादाब खान, यासिर शाह.

या दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या फलंदाज प्रशिक्षकपदी युनूस खान या माजी अनुभवी क्रिकेटपटूची नुकतीच निवड करण्यात आली आहे. तर यापूर्वीच पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मिसबाह उल हक यांची निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.