Ceasefire Violation By Pakistan: पाकच्या कुरापती सुरुच; एलओसीवर केला गोळीबार, भारताचा जवान शहीद

Pakistan fire on LOC, one Indian soldier martyred पाककडून राजौरी जिल्ह्यात 4 आणि 10 जून रोजी सीमेवर झालेल्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद झाला होता. 10 जूनपर्यंत पाकिस्तानने 2027 पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील कठुआ, राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने अंदाधुंद गोळीबार केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सोमवारी तीन जिल्ह्यात गोळीबार केला आहे. या गोळीबारादरम्यान राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये एक जखमी जवान शहीद झाला. यापूर्वी 14 जून रोजी पुंछ जिल्ह्यात सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद झाला होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुंछ जिल्ह्यातील कृष्णा खोरे सेक्टर आणि राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आणि कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही मोर्टार डागले जात आहेत आणि गोळीबारही सुरु आहे.


नौशेरा सेक्टरमध्ये सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आघाडीवरील चौकीवर तैनात एक जवान जखमी झाला होता. उपचारावेळी या जवानाने अखेरचा श्वास घेतला. हवालदार दीपक करकी असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.

राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी गोळीबारात शहीद झालेला हा चौथा जवान होता. पाककडून राजौरी जिल्ह्यात 4 आणि 10 जून रोजी सीमेवर झालेल्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद झाला होता. 10 जूनपर्यंत पाकिस्तानने 2027 पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.