_MPC_DIR_MPU_III

Pakistan New Political Map : पाकिस्तानचा नवीन नकाशा ; जम्मू काश्मीर, लडाख, जुनागड दाखवले पाकिस्तानचा हिस्सा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी स्वत: ही माहिती दिली. : New map of Pakistan; Jammu and Kashmir, Ladakh, Junagadh showed part of Pakistan

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीर-लडाख-जुनागड हा पाकिस्तानचाच एक भाग असल्याचे दाखवून पाकिस्तानी मंत्रिमंडळाने पाकिस्तानच्या नवीन राजकीय नकाशाला मान्यता दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी स्वत: ही माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_IV

मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे सर्व विरोधी पक्ष आणि काश्मिरी नेतृत्वाने स्वागत केल्याचेही त्यांनी सांगितले.

इम्रान खान म्हणाले की, ‘पाकिस्तानचा नवीन राजकीय नकाशा पाकिस्तानच्या जनतेच्या विचारांचे प्रतिनिधित्व करतो. पाकिस्तान आणि काश्मीरमधील लोकांच्या वैचारिक विचारसरणीचे समर्थन करतो.

_MPC_DIR_MPU_II

गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी भारताने काश्मीरमधील 370 कलम बेकायदेशीर हटवले होते. हा नकाशा त्या निर्णयाचे समर्थन करत नाही. तसेच पाकिस्तानच्या सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयात हाच नकाशा अधिकृत मानला जाईल, असेही इम्रान खान म्हणाले.

दरम्यान, भारताने याबाबत आपले मत मांडले असून पाकिस्तानचा हा प्रयत्न म्हणजे बिनबुडाची राजकीय व्याप्ती असल्याचे म्हटले आहे.

भारतातील जुनागढ, जम्मू काश्मीर आणि लडाखच्या प्रदेशांवर हक्क सांगणे हास्यास्पद आहे. याला कोणतीही कायदेशीर वैधता किंवा आंतरराष्ट्रीय विश्वसनीयता नाही.

पाकिस्तानच्या या नवीन प्रयत्नामुळे त्यांचा सीमावर्ती दहशतवादाला पाठिंबा असल्याची पुष्टी होत असल्याचे भारत सरकारने म्हटलं आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.