Pakistan News : ईदच्या दिवशीच पाकिस्तानमध्ये 3 ठिकाणी स्फोट; 52 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : आज पाकिस्तानमध्ये 2 ठिकाणी 3 बॉम्बस्फोट झाले. पहिला स्फोट बलुचिस्तानमधील एका (Pakistan News) मशिदीजवळ झाला. हा आत्मघाती हल्ला होता. यामध्ये डीएसपीसह 52 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. हल्ल्याच्या वेळी लोक ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीसाठी जमले होते.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका संशयित आत्मघाती स्फोटात किमान 52 लोक ठार आणि 50 जखमी झाले. काही तासांनंतर, एका मशिदीच्या आत आत्मघाती स्फोटात, पाकिस्तानच्या अशांत खैबर पक्थुनख्वा प्रांतात किमान तीन लोक ठार आणि सहा जण जखमी झाले.

बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात, अल फलाह रोडवरील मदिना मशिदीजवळ स्फोट झाला, जेथे ईद साजरी करण्यासाठी भाविक जमले होते. पाकिस्तान मीडिया हाऊस डॉनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ईद मिलादुन नबी उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात येत असताना हा स्फोट झाला.

Pimpri : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या सदस्यांकडून स्वच्छता दूत, वाहतूक स्वयंसेवक म्हणून सेवा

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंगचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गशकोरी यांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. संशयित आत्मघाती हल्लेखोराने ऑन-ड्युटी पोलिस अधिकाऱ्याच्या कारजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला.

दुसरा स्फोट हांगू जिल्ह्यातील मशिदीमध्ये जुमाच्या नमाजाच्या वेळी झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की स्फोटाच्या वेळी मशिदीत 30 ते 40 लोक होते. हा आत्मघातकी स्फोट (Pakistan News) असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षा उपाय कडक करण्यात आल्याची घोषणा कराची पोलिसांनी ट्विटरवर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.