Shahid Afridi Test Positive : पाकिस्तान क्रिकेटर ‘शाहिद आफ्रिदी’ कोरोना पॉझिटिव्ह

Pakistani Cricketer Shahid Afridi tests positive for Covid-19 त्याने स्वतः ट्विट करत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

एमपीसी न्यूज- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. शाहिद आफ्रिदीनेच याची माहिती दिली आहे. त्याने स्वतः ट्विट करत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

शाहिद आफ्रिदीने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘गुरुवार पासून मी आजारी होतो, माझे सर्व शरीर दुखत होते. दुर्दैवानं माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आशा करतो की मी याच्यातून लवकर बरा होईन, इन्शाल्ला…


विशेष म्हणजे शाहिद आफ्रिदी आपल्या फाऊंडेशनच्या मदतीने लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत करत होता. यादरम्यान तो चर्चेतही राहिला. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरवर भाष्य करुन वाद ओढावून घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.