Pimpri : इंटरॅक्ट क्लब ऑफ एच.ए स्कूलच्या अध्यक्षपदी पलक पुरोहित

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या एच.ए स्कूलच्या इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी पलक पुरोहित तर सचिवपदी  शशांक खेंग्रे यांची निवड करण्यात आली. 

_MPC_DIR_MPU_II

इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ पिंपरीतील एच.ए स्कूलमध्ये नुकताच पार पडला. यावेळी इंटरॅक्ट क्लब ऑफ एच.ए स्कूलची पुढील वर्षीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पदग्रहण सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, प्रमुख पाहुणे दिनकर पळसकर, सचिव महादेव शेंडकर, रवींद्र भावे, बाळकृष्ण उ-हे, सुवर्णा काळे, तसनीम शेख, आनंद सूर्यवंशी उपस्थित होते.

अध्यक्ष  सदाशिव काळे यांनी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या कामाची माहिती दिली. तसेच आगामी काळात  राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे दिनकर पळसकर यांनी इंटरकॅक्टच्या कार्यपद्धतीबद्दलची माहिती दिली. वेलांगली जोसेफ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1