Palghar Earthquake News: महाराष्ट्रात पालघर येथे 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात पालघर येथे आज रात्री 9:33 वाजता साडेतीन रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) च्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, केंद्रशासित प्रदेश लडाखच्या लेहला आज पहाटे 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप पहाटे 5:13 वाजता झाला. भूकंपाचे केंद्र भूपृष्ठापासून 10 किलोमीटरच्या खोलीवर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.