Pimple Gurav : ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- पिंपळे गुरव येथील एम जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित, ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

श्रीविठ्ठल-रखुमाई प्रतिमेचे पूजन संस्थापिका शांताबाई देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत निवृत्ती, संत सोपान, संत मुक्ताबाई इत्यादी संतांची वेशभूषा केली होती. हातात भगव्या पताका घेऊन, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव आदी पर्यावरणविषयक संदेश देत, चालली दिंडी पंढरीला … भक्तिगीतासह हरिनामाचा गजर करत ही दिंडी भक्तिमय वातावरणात साई मंदिरापर्यंत गेली. मंदिरात श्रीसाईंच्या प्रतिमेचे पूजन संभाजी नेवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

रिमझिम पावसाचा आनंद घेत, विठ्ठलनामाचा गजर करत या छोट्या वारकऱ्यांनी उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. शेवटी खाऊवाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली. या पालखी सोहळ्यास हभप ज्ञानदेव कारखीळे, रामदास देवकर, संभाजी नेवसे, नवनाथ देवकर, सरस्वती देवकर व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका वंदना देवकर व सर्व शिक्षकांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.