Alandi : पालखी सोहळा रथापुढील 1 ते 27 व मागील 1 ते 20 या दिंड्याची भक्त निवासमध्ये बैठक

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi)  येथे दि.24 मे रोजी  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या भक्त निवास स्थानामध्ये पालखी सोहळ्यातील रथा पुढील 1 ते 27 व मागील 1 ते 20 या दिंड्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

PMRDA: पीएमआरडीएला मिळाली आयकरातून सूट

मागील वर्षी अडीच ते तीन तास प्रस्थानास उशीर झालेला होता. प्रस्थान सोहळ्या दरम्यान माऊलीं मंदिरात दिंडीतील वारकरी संख्या किती असावी याबाबत चर्चा येथे झाली.

यावेळी सोहळा प्रमुख अ‍ॅड विकास ढगे पाटील यांनी मंदिरातील ऑडिड नुसार संख्याची माहिती दिली. मंदिरात असणारी प्रस्थाना दरम्यान संख्या याची माहिती दिली. सद्यस्थितीत देवस्थानचे 3 विश्वस्त कार्यरत आहेत. व 3  माजी विश्वस्त यांची जागा न भरल्याने यावेळी त्या तीन माजी विश्वस्तांचे सहकार्य या पालखी सोहळ्यात घेणार आहोत हे स्पष्ट केले.

प्रस्थान सोहळा शिस्तीत वेळेत झाला पाहिजे व या सोहळ्यास गालबोट लागू नये , याबाबत येथे चर्चा करणार आहोत.
यावेळी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांनी मंदिरातील सोहळ्या व्यतिरिक्त इतर नागरिक संख्या यांच्या विषयी मते मांडली. दिंडी प्रमुखांनी मंदिरातील सोहळ्या दरम्यान असणाऱ्या त्यांच्या दिंडीतील वारकरी भाविकांचे नियोजन संख्या याबाबत आपली विविध मते संकल्पना सांगितल्या.

राजाभाऊ रंधवे (चोपदार ) यावेळी म्हणाले माऊलीं मंदिरात प्रस्थान सोहळ्या दरम्यान किती लोक आतमध्ये घ्यायची त्यासंदर्भात आपण जमलो आहोत. प्रशासनास सहकार्य करण्याची सर्वांची इच्छा आहे. आपले प्रश्न प्रति प्रश्न यांचा संवाद आप आपल्यात होत असतो. आपली भाषा त्यांच्या लक्षात येत नाही व त्यांची भाषा आपल्याला लक्षात येत नाही.

त्यामुळे अंतर निर्माण होते. काही दिंडीमध्ये कमी जास्त संख्या असते ते त्यांनी निर्दशनास आणून दिले. संबंधित प्रश्नांसंदर्भात देवस्थान व दिंडीवाले यांनी समनव्याने एखादा माणूस नियुक्त करावा. या दोघांची एकत्रता जुळण्यासाठी असे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी सोहळा प्रमुख अ‍ॅड.  विकास ढगे पाटील म्हणाले, हा प्रश्न वारकरी प्रमुख यांच्या समनव्याने सोडवावा लागेल. यासाठी तीन माजी विश्वस्त यांची नियुक्ती करत आहे. त्या संदर्भातील नियोजन , जबाबदारी त्यांचा कडे देत आहोत. या चर्चेवेळी जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेडकर व सह धर्मादाय आयुक्त सुधीर बुक्के यांनी वारीकाळातील नियोजना बाबत व भविष्यात अनुचित प्रकार घटना घडू नये यासाठी मार्गदर्शन केले.

सुधीर बुक्के यावेळी मांढरदेवी घटनेबाबत माहिती दिली. तशी घटना भविष्यात घडू नये यासाठी यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, आळंदी (Alandi) वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, बाळासाहेब आरफळकर, माजी विश्वस्त अभय टिळक व दिंडी प्रमुख , वारकरी मान्यवर उपस्थित होते. सरते शेवटी माजी विश्वस्त व दिंडी प्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

Hadapsar : पत्नीचा त्रास, पतीचा गळफास; पत्नीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.