PAN update : पॅन क्रमांक अपडेट करण्याच्या नादात गमावले 58 हजार

एमपीसी न्यूज : खाते बंद झाले असून ते पुन्हा सुरु करण्यासाठी पॅन क्रमांक अपडेट करा, असा मेसेज करून बँक खात्याची माहिती घेत 58 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली.(PAN update) ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी शिवाजीपार्क, चिंचवड येथे घडली.

सुनील जगन्नाथ ननवरे (वय 54, रा. शिवाजीपार्क, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-

BJP Challenge : आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा,आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना बुधवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांना 8514895466 या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. तुमचे एसबीआय योनो अकाउंट बंद झाले असून खालील लिंकद्वारे पॅन क्रमांक अपडेट करा, असे त्या मेसेजमध्ये सांगण्यात आले.(PAN update) त्यानुसार फिर्यादींनी लिंकवर क्लिक करून त्यात आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती भरली. त्या माहितीच्या आधारे अज्ञाताने फिर्यादी यांच्या खात्यातून 58 हजार 214 रुपये काढून घेत फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.