Pandharpur and Belgaum By Election Results 2021 : तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ६३८ मतांनी आघाडीवर

पंढरपूर विधनसभा पोटनिवडणूक मतमोजणीस सुरुवात

0

एमपीसी न्यूज : पंढरपूर विधनसभा पोटनिवडणूक मतमोजणीस सुरुवात करण्यात आली आहे. अत्यंत काट्याची टक्कर असलेल्या या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. आता पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर आहेत. 

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. भालके यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली होती. या पोटनिवडणुकीसाठी एकूण 340889 मतदारांपैकी 225498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 66.15 टक्के मतदान या पोटनिवडणुकीसाठी झालं. पंढरपुरात प्रचंड मतदान झाल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment