Pandharpur By-election : प्रतिष्ठेच्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय

0

एमपीसी न्यूज – संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर पोट निवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना धक्का बसला आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या 35व्या फेरीअखेर भाजप आघाडीवर असून राष्ट्रवादी पिछाडीवरच आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

भाजपच्या समाधान आवताडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीची मतमोजणी 38 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून 36व्या फेरीनंतर 4103 मतांची आघाडी घेतली आहे.

_MPC_DIR_MPU_II

36वी मतमोजणी फेरी
भाजप : समाधान अवताडे : 104285
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 100183
अभिजीत बिचकुले – 125
भाजप 4103 मतांनी आघाडीवर

निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व आमदार गोपीचंद पडळकर यांचे  अभिनंदन केले. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात बाळा भेगडे व गोपीचंद पडळकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment